• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

जळगाव, दि.२० (प्रतिनिधी) : ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि. १९ व २० ऑक्टोबर असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडेमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF अॅडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी अशोक जैन म्हणाले की, अशा प्रकारच्या सेमीनारचे बुद्धिबळाच्या विकासासाठी, सक्षम व कुशल आरबीटर व कोचेस साठीचे महत्त्व विषद केले. चेस इन स्कूलचे महत्त्व विषद करून आरबीटर व कोचे यांनी सेमीनारचा फायदा घ्यावा व या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे अपडेट करावे असा मोलाचा सल्ला दिला.

चिफ फॅकल्टी इंटरनॅशनल आरबीटर वसंत बी. एच. व आय.ए. नितीन शेणवी, पुणे यांचे स्वागत आय.ए. प्रवीण ठाकरे व आकाश धनगर यांनी केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल इ. विविध राज्यांमधून एकुण ८० चेस आरबीटर व कोचेस यात सहभागी झालेले आहेत. जळगावमधून नथू सोमवंशी, भरत आमले व आकाश धनगर यांनी सहभाग नोंदवला. या सेमीनारसाठी जैन इरिगेशन प्रायोजकत्व लाभले.

सचिव नंदलाल गादिया यांनी सूत्रसंचलन केले व सर्वांचे आभार मानले. बुद्धीबळ आरबीटरची क्षमता व कौशल्य वाढवणे, सुक्ष्म नियमांची माहीती देणे, तांत्रिक कौशल्य सुधारणे, टुर्नामेंटचे स्टॅंडर्डायझेशन (मानकीकरण) करणे, सहयोग वाढवणे, भविष्यातील नेते विकसीत करणे, बुद्धीबळ Ecosystem (परिसंस्था) वाढवणे, एकूण बुद्धीबळ पायाभूत सुविधा मजबूत करणे इत्यादी उद्दीष्ट या सेमीनारने साधले जातील सेमीनारच्या यशस्वीतेसाठी रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.


Tags: #sports
Next Post
आ. राजू मामा भोळे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब

आ. राजू मामा भोळे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group