जळगाव, दि. 2 – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, भुसंपादन अधिकारी किरण सावंत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.