• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रियकराच्या मदतीने नणंदेने काढला भावजयीचा काटा..!

अमळनेर येथील खुनाचा छडा, नणंदेसह दोघांना अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 23, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
प्रियकराच्या मदतीने नणंदेने काढला भावजयीचा काटा..!

जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर शहरात गांधलीपुरा भागात रविवारी महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान या संपुर्ण प्रकरणाचा छडा अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे लावला आहे. नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर सासूच्या जागेवर सून लागू नये, तिच्या जागी आपणच लागावे म्हणून सुनेच्या नणंदेनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

शितल जय घोगले (वय ३५, रा. मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या पती, सासू यांच्यासह राहत होत्या. रविवारी दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान मेहतर कॉलनी समोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शितल घोगले यांचा मृतदेह आढळून आला होता. (केपी) या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवली होती. मिळालेल्या गोपनीय माहिती व पुराव्याच्या आधारे त्यांनी शितलच्या मारेकऱ्यांना हुडकून काढले. मयत शितल घोगले हिची नणंद व तिचा प्रियकर यांना अटक केली.

तपासातून समोर आली धक्कादायक माहिती..
मयत शितल घोगले यांची सासू पारोबाई परशुराम घोगले (वय ५५) या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा जय हा आजारी असतो. म्हणून पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शितल लागेल. तिच्या ऐवजी मुलगी म्हणून आपणच लागले पाहिजे असा विचार शितल घोगले यांच्या नणंदेचा तथा पारूबाई यांची मुलगी मंगला हिचा होता. (केपी) त्यातूनच हे हत्याकांड घडले. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शितल आणि मंगलाबाई या दोघी शौचासाठी काटेरी झुडपात गेल्या होत्या. नंतर मुलगी मंगला ही परतली मात्र शीतल ही दिसून आली नाही. म्हणून शोधाशोध सुरू झाल्यानंतर काटेरी झुडपात शितल ही मृत अवस्थेत आढळून आली.

पोलिसांना तपासामध्ये मंगला हिने मी शौचाहून पाच मिनिटातच परत आली असे सांगितले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ती तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली आहे. तसेच तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळताच तिला विचारले, मी त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही असे तिने सांगितले. मात्र सीडीआर रिपोर्ट तपासला असता ती वारंवार आणि रात्री देखील तिचा प्रियकर याचेशी बोलत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संशयित आरोपी मंगला घोगले हिच्यासह तिचा प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४, रा. आयोध्या नगर, बंगाली फाईल) याच्या मदतीने नणंद मंगला हिने भावजय शितलचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे तपास पूर्ण केला आहे.


 

Tags: AmalnerCrimeJalgaonPolice
Next Post
रिक्षातून घरी जाताना महिलेचे रोकड दागिने लांपास ; जळगाव शहरातील घटना

रिक्षातून घरी जाताना महिलेचे रोकड दागिने लांपास ; जळगाव शहरातील घटना

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group