• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलींच्या शासकिय वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 20, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
मुलींच्या शासकिय वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट

जळगाव, दि.२० : शालेय जीवन हे रोपटे आहे, त्याला अभ्यासरुपी संस्कार देऊन त्याचे वृक्षात रूपांतर करण्याचे काम दुसरे कोणी नाही तर स्वतः करायचे असते याची जाणीव होण्यासाठी आयुष्याचं निश्चित करायचे असते. ते ध्येय मग तुम्हाला कोणतेही प्रलोभन आले तरी विचलित करत नाही. हे सगळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सांगत होत्या, मध्येच त्या आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत होत्या. त्यात त्याही तल्लीन झाल्या होत्या आणि ऐकणाऱ्या मुलीही समरस झाल्या होत्या.

सामाजिक न्याय न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात त्यांचा कोणताही पूर्व नियोजित दौरा नसताना आल्या. जळगाव जिल्ह्यात त्यांचा १८ आणि १९ सप्टेंबर या दोन दिवसाचा दौरा होता. तो नियोजित दौरा पूर्ण करून त्या १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुलींच्या वसतीगृहात आल्या.

मुलींशी मनसोक्त गप्पा..
यावेळी त्यांनी मुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या, सुरुवातीला अवघडलेल्या मुली नंतर त्यांच्या संवादात एकरूप झाल्या. यावेळी मुलींनी मनात असलेल्या अनेक प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. यावेळी श्रीमती चाकणकर यांनी आईच्या ममतेनी मुलींना वाढते सायबर गुन्हे, त्यात होणारी मुलींची फसवणूक याबाबत सविस्तर माहिती दिली. या सायबरच्या मायाजाळात न अडकता आपल्याला जीवनात कसे यशस्वी होता येईल, जेणे करून आपल्या माता – पित्याची मान अभिमानाने उंचावेल हे पहा. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षितते विषयीचे कायदे, महिला आयोगाचे कामकाज, महिलांच्या सबलीकरणासाठीच्या शासनाच्या योजना याची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान त्यांनी वसतीगृहातील स्वयंपाक घरात जाऊन जे मुलींना रोज जेवण दिले जाते. त्या जेवणाचा आस्वादही घेतला. वसतीगृहातील सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. महिला आणि मुलीसाठी सामाजिक न्याय विभाग जिल्ह्यात काय काय करत आहे हे पण विशद केले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी विनिता सोनगत, अधिक्षक वैशाली पाटील उपस्थिती होत्या.

Tags: Rupali chakankar
Next Post
रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add