• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 20, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

जळगाव, दि.२० (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.

यात १२० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी रोटरी रॉयलचे अध्यक्षा डॉ. वर्षा रंगलानी यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रश कसा करावा आणि दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सांगितले. डॉ. नितीन  विसपूते यांनी व्यसनांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तंबाखू, गुटखा, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

डॉ. बिंदू छाबडा यांनी विद्यार्थ्यांना हाताधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. रोटरी क्लब रॉयल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना ब्रश आणि बिस्कीट वाटप केले.  डॉ. जयदिपसिंग छाबडा, नितीन मंधान, पिंकी मंधान, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. निशा तलरेजा, आणि सिमा मुलानी यांनी दंत चिकित्सक शिबिरासाठी सेवा दिली. ज्यांना दंतचिकित्सक विषयी समस्या होत्या, त्यांना पुढील उपचारासाठी टोकन देण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार हे मौखीक आरोग्याच्या दृष्टाने समस्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत माहिती पोहचविणार आहे. प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जि.प. शाळेच्या शिक्षिका रत्नप्रभा वाणी, कल्पना सपकाळे, हर्षा तायडे, पुनम बागुल यांनी शिबिराच्या व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले.


 

Next Post
पंतप्रधान मोदींनी पोहरादेवीला पाय ठेवू नये.. ; गोरसेना संघटनेचा इशारा

पंतप्रधान मोदींनी पोहरादेवीला पाय ठेवू नये.. ; गोरसेना संघटनेचा इशारा

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group