जळगाव, दि. 25 – जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दोन दिवसांपासून भुतांचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोयं. यात काही तरुण चारचाकी वाहनातून जात असताना त्यांना रस्त्यात दोन भूतं दिसत असल्याचं सांगण्यात येतयं. या संपुर्ण प्रकरणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरत आहे.
दरम्यान पोलिस विभागाकडून या घटनेचा पर्दाफाश करण्यात आलायं. भुतांचा खोटा व्हिडिओ तयार करून वायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर हा व्हायरल होणारा व्हिडिओ बनावट व खोटा असून जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचे पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी सांगितले, तसेच हा व्हिडिओ व्हायरल न करण्याची देखील नागरिकांना आवाहन केले.
पहा.. व्हिडिओ