मुंबई (वृत्तसंस्था ) ;- गणेशोत्सव काळात अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या काळात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आज 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने मुलीला जन्म देत चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होते.
सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असंही तिने म्हटलं होतं. अखेर गणेशोत्सव काळात दीपिका आणि रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे दोघं आई-बाबा बनले आहेत. रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते.
रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत खास इच्छा बोलून दाखवली होती. रणवीरला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शनिवारी
दीपिकाला
मुंबईतील एचएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापूर्वी शुक्रवारी रणवीर आणि दीपिका हे मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. आता दीपिकाच्या डिलिव्हरीची बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे