जळगाव (प्रतिनिधी ) : विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रंजिता राहूल सोनार वय २४ रा. सोमानी गल्ली, पिंप्राळा, जळगाव असे मयत झालेल्या तरूणीचे नाव आहे.
रंजिता सोनार ही तरूणी आपल्या कुटुंबासह पिंप्राळ्यातील सोमाणी गल्लीत वास्तव्याला होती. गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी घरी काम करत असतांना तिला इलेक्ट्रीक शॉक लागल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.