• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विरवाडे येथील तरुणाचा गूळ धरणात पाय घसरून मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 1, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
विरवाडे येथील तरुणाचा गूळ धरणात पाय घसरून मृत्यू

चोपडा (प्रतिनिधी ) तालुक्यातील विरवाडे येथील प्रौढ व्यक्तीचा मालापूर येथील गुळ धरणात पाय घसरून पडल्याने बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीला आले आहे. या घटनेमुळे विरवाडे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) रा.‍विरवाडे ता. चोपडा असे मयताचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील डिप्लोमा इलेक्ट्रिक इंजिनीअर झालेले तरुण शेतकरी नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) हे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विरवाडे गावापासून चार किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मालापूर येथील गुळ धरणावर फिरायला गेले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नितीन प्रविणसिंग पाटील त्यांचा पाय घसरल्याने धरणाच्या १५ मीटर खोल पाण्यात पडले, त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरवाडे गावात समजताच कुटुंबियांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गुळ धरण गाठले.

त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पट्टीचे पोहणारे कैलास नारायण शिरसाठ, नारायन गोपीचंद शिरसाठ, सुनील नारायण शिरसाठ, श्रीराम गोपीचंद शिरसाठ, उत्तम सुका सोनवणे, नारायण देविदास भिल यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. व चोपडा उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आला. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पश्चात आईवडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

Tags: chopdaCrime
Next Post
रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसम ठार ; जळगाव शहरातील घटना

रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसम ठार ; जळगाव शहरातील घटना

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add