• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात महामार्गावर पुन्हा अपघात ; वृद्ध जागीच ठार

नागरिकांनी महामार्गावर केला रास्ता रोको

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 31, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात महामार्गावर पुन्हा अपघात ; वृद्ध जागीच ठार

जळगाव, दि.३१ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच असून दोन दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी महामार्ग रास्ता रोको करून जाम केला. प्रसंगी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचरण करण्यात आले होते.

अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते द्वारका नगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. अजबसींग पाटील शनिवारी सकाळी १० वाजता ते द्वारका नगर स्टॉपजवळ पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिकांनी घटनास्थळी संतप्त होत महामार्गावर रास्ता रोको केला.

VIDEO

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240831-WA0023.mp4

या वेळेला माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक जण घटनास्थळी पोहोचले. दरम्यान मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या वेळेला प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बांभोरी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शिव कॉलनीपर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

दरम्यान धडक देणाऱ्या कारचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने घटनास्थळी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार शितल राजपूत, उपपोलीस अधिक्षक कृष्णकांत पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दोन दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला चिडल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी ७८ वर्षीय वृद्धाला कारने चिरडल्याने नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. गेल्या ११ वाजेपासून दीड वाजेपर्यंत ट्राफिक जाम होती. दरम्यान जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तहसीलदार शितल राजपूत यांनी दोन दिवसात नागरिकांचे प्रश्नन मार्गी लावणार असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


 

Tags: accidentJalgaon city
Next Post
विरवाडे येथील तरुणाचा गूळ धरणात पाय घसरून मृत्यू

विरवाडे येथील तरुणाचा गूळ धरणात पाय घसरून मृत्यू

ताज्या बातम्या

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group