जळगाव, दि. 25 – सद्या कोरोना काळात शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सुरु आहे. यात शिक्षण देताना अनुभवातून शिक्षण या क्लूप्तीचा नावीन्यपूर्ण स्वरूपात उपयोग करत प्रगती विद्यामंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोज भालेराव यांनी निसर्गसानिध्यात अभ्यासाचे धडे हा उपक्रम राबवला.
यात विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या वनस्पतीचे अवयव जसे कि पान, फुल, फळे, खोड यांचे निरीक्षण करायला सांगितले. पानांचे निरीक्षण करताना पानांचे मुख्य प्रकार, साधे पान व संयुक्त पान हे आहेत. ते कसे ओळखायचे, सपुष्प वनस्पती व अपुष्प वनस्पती हे कसे ओळखायचे, पानांचे भाग इत्यादीची माहिती त्यांना निसर्गसानिध्यात जाऊन स्वतःच्या निरीक्षनातून आणि त्यात आलेल्या अनुभवातून शिकविण्यात आले. आपण निसर्गातून खूप काही शिकू शकतो हे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळाले.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी केले. तसेच निसर्ग आपला गुरु असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी अनुभवातून शिकलेले कधीच आपण विसरू शकत नाही. म्हणून स्वतःच्या अनुभवातून शिकणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांनी अशाचा पद्धतीने विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहान केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी तसेच सर्व शिक्षकांनी कौतुक केले.