नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रातील सत्तारूढ भाजपने मंगळवारी ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना मध्य प्रदेश, तर रवनीतसिंह बिट्टू यांना राजस्थानमधून उमेदवार बनवण्यात आले आहे. याचवेळी भाजपने महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने राज्यसभेच्या ११ पैकी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली.१२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात एनडीए १२ पैकी ११ जागांवर निवडणूक लढविणार आहे.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थान, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय हरियाणातून किरण चौधरी, ओडिशातून ममता मोहंता तर, त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्जी निवडणुकीसाठी उभे आहेत. तर महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्र, आसाममधून रंजन दास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.