जळगाव दि. २० (प्रतिनिधी) – जळगाव येथील जुना हायवे स्थित कांताई नेत्रालय येथे ‘डोळे माझे मौल्यवान’ ह्या विषयावर बुधवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता आनंदाश्रम सेवा संस्था व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे चाय पे चर्चा अंतर्गत व्याख्यान व प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम आयोजला आहे.
यामध्ये कांताई नेत्रालयाचे व्यवस्थापक अमरनाथ चौधरी व कांताई नेत्रालयातील निष्णात फेको सर्जन डॉ. अमोल कडू ह्यांचा सहभाग असेल. जळगाव शहरातील सर्व ज्येष्ठांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ऍड. अरुण धांडे व आनंदाश्रम सेवा संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड यांनी कळविले आहे.