• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ह्रदयद्रावक: निंबादेवी धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ह्रदयद्रावक: निंबादेवी धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या घटनेने यावल तालुक्यात सर्वत्र हळहळ

जळगाव (प्रतिनिधी) : ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी यावल तालुक्यातील निंबादेवी धरण येथे मित्रांसह पर्यटनासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. घटना प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०, रा. निमगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो निमगाव येथे आई-वडील, बहिण यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.दरम्यान, सोमवारी दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत वेदांत पाटील हा निंबादेवी धरण येथे पोहोचण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यातला खड्ड्यात पडल्याने बुडायला लागला.

दरम्यान, त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत पाण्यात उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. या वेळेला काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

दरम्यान, यावेळी वेदांत पाटीलच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. डोळ्यांसमोर मित्र बुडाल्याने मित्रांना शोक अनावर झाला होता. यावल पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. एकुलता एक मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकुलता भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निमगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Tags: nimbadevi damYawal
Next Post
एरंडोल येथे गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजविणारा जेरबंद

एरंडोल येथे गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजविणारा जेरबंद

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add