• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने १२ वर्षीय मुलगा दगावला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 17, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतात तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने १२ वर्षीय मुलगा दगावला

चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी वाकडी शिवारात घडली. या घटनेत मुलाचे वडीलदेखील थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महेश अनिल सूर्यवंशी असे मयत बालकाचे नाव आहे. दरम्यान आमदार मंगेश चव्हाण हे वाकडी गावात आले होते. आमदार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांना सूचित केले. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिल्या. महेशच्या दुर्दैवी मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे नुकसान न भरून निघणारे आहे. मात्र वीज वितरण कंपनी व शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मयताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले.

Tags: chalisgaonCrimeJalgaon
Next Post
कायम चांगले काम करीत राहा ही संतांची शिकवण : आ. राजूमामा भोळे

कायम चांगले काम करीत राहा ही संतांची शिकवण : आ. राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

June 26, 2026
रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!
क्रिडा

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

June 26, 2026
मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group