गोलाणी मार्केट्मधील घटनेमुळे खळबळ
जळगाव (प्रतिनिधी ) : गोलाणी मार्केटमध्ये कॉम्प्युटर व्यवसाय करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीने दुकानातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी स्वातंत्र्य दिनी १५ रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली . मात्र कर्जाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे महिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. रमेश देवराम पाटील (वय ५१ रा. गाढोदा ता. जळगाव हा. मु.रा.निवृत्ती नगर, जळगाव ) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सूत्रांची माहिती अशी कि, रमेश पाटील यांचे ॲरोटेक कॉम्प्युटर नावाचे गोलाणी मार्केटमधील ग्राऊंड प्लोअरला सी – २४६ क्रमांकाचे दुकान आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रमेश पाटील यांनी दुकान उघडून ड्वेपूजा करून नंतर अर्धवट शटर बंद करून गळफास घेतला . यानंतर दुकानात काम करणाऱ्या त्यांचा भाचा मनोज कुमार जाधव याने शटर उघडून पाहताच तयाने आरडा ओरड केल्याने आवाज ऐकून शेजारच्या व्यापाऱ्यांनी धाव घेतली.
यावेळी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले . यावेळी घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केली होती. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची माहिती घेतली . याबाबत उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु होते.दरम्यान मयत रमेश पाटील यांच्या पश्चात आई पत्नी २ मुली १ मुलगा असा परिवार आहे.