• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. राजुमामा भोळेंनाच मिळणार विधानसभेची संधी !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 14, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. राजुमामा भोळेंनाच मिळणार विधानसभेची संधी !

नवीन रस्त्यांसाठी निधी, चिंचोलीत एमआयडीसी अधिग्रहणाची प्रक्रिया : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आ. भोळेंचा प्रभाव पुन्हा स्पष्ट

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा भोळे यांना विधानसभेच्या पुढील पंचवार्षिकसाठी पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राजूमामांची गल्ली ते दिल्ली ओळख असण्याने व लोकप्रियतेमुळे राजूमामा यांना पुन्हा पक्षातर्फे संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठीदेखील अनुकूल असल्याचे मंगळवारी दि. १३ रोजी झालेल्या शासकीय कार्यक्रमात पुन्हा एकदा दिसून आले आहे. शहरातील उर्वरित नवीन रस्त्यांसाठी १०० कोटी जाहीर करण्यासह एमआयडीसीचा विस्तार व रोजगार निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याने आ. राजूमामांचे विधानसभेतील वजन पुन्हा एकदा दिसून आले आहे.

तसेच, राजुमामांचा कामाचा धडाका व लोकप्रियता पाहता त्यांनाच पुढील पंचवार्षिकीसाठी पुन्हा संधी देण्यात येईल असा सूर नागरिकांमध्ये उमटला आहे. भाजपातर्फे आज इच्छुकांची नावे व संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून यात जळगाव शहर विधानसभेसाठी आ. राजू मामांचे नाव पुन्हा एकदा अंतिम झाल्याचे समजून आले आहे.

जळगाव शहर विधानसभेसाठी आ. सुरेश भोळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा धडाका तसेच सर्व समाजात त्यांचा वावर यासह त्यांची जनसेवा या सर्व बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत. शहरासाठी आ. भोळे यांनी वेळोवेळी विकासनिधी देखील मंजूर करून आणला आहे. त्यामुळे शहरात विविध अंगाने विकास झालेला आहे. काही ठिकाणी उणीव आहेत. मात्र पुढील पंचवार्षिकला आ. भोळे हे हि उणीवदेखील नक्की भरतील यात शंका नाही. तसेच, मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी शहरात “माझी लाडकी बहीण” योजना कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते आले होते. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मामांच्या कार्याचा गौरव करून विकासासाठी अजून निधी दिला जाईल असे सूतोवाच दिले.

जळगाव शहराला लागून चिंचोली येथे नवीन एमआयडीसी वसली जाणार आहे. त्याकरिता आता जागा अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सकारात्मकता दर्शवली आहे. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.


Tags: #ekanathshinde #jalgaon #maharashtra#rajumamaMla suresh bhole
Next Post
धक्कादायक : कर्जाला कंटाळून व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

धक्कादायक : कर्जाला कंटाळून व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन

September 3, 2025
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद
खान्देश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद

September 2, 2025
अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2025
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा

September 1, 2025
२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group