मुंबई (वृत्तसंस्था ) : लोकल ट्रेनमध्ये इटालियन पिस्तुल घेऊन जाणाऱ्या बिहारच्या एका मॉडेलला जीआरपी पोलिसांनी बोरिवली रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी अभय कुमार आणि उमेश कुमार चौरसिया या दोघांना शुक्रवारी मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावरून रेल्वेत इटालियन बनावटीचे पिस्तूल आणि १४ काडतुसे सापडल्याप्रकरणीअटक करण्यात आली आहे.
बोरिवली रेल्वे स्टेशन पुलावर गस्त घालणाऱ्या एका हवालदाराने एका व्यक्तीला थांबवले आणि त्या व्यक्तीने पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर कॉन्स्टेबलने त्याला पोलिस ठाण्यात आणले, तेथे तपासादरम्यान आरोपीच्या बॅगेतून एक विदेशी पिस्तूल आणि १४ काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी नियमित तपासणीदरम्यान मॉडेलला अटक केली. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळील पुलावर एका ट्रॉली बॅगमध्ये अवैध पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी अभय कुमारला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहेत.