अमळनेर (प्रतिनिधी) : येथील भारत फायनान्शियल इन्कुलुजम लिमिटेड या बँकेला दोघा कर्मचाऱ्यांनी ११ लाख १५ हजारांचा गंडा घातल्याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे व्यवस्थापक अमोल सुरेश मराठे (शिवपार्वती कॉलनी, बसस्टॅन्डच्या पाठीमागे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. फिल्ड ऑफिसर संशयित आरोपी उमाकांत आधार विसावे (झुरखेडा, ता. धरणगाव) व मयूर मिठाराम बडगुजर (सुंदरगडी, चोपडा) हे दोन्ही एक ते दीड वर्षापासून नोकरीस आहेत. त्यांचे काम कर्जदाराकडन हप्त्याची वसुली रक्कम जमा करुन ती ऑफिसला आणून भरण्याचे असते. संशयित आरोपींनी ११ ऑगस्ट २०२३ ते दि. ५ एप्रिल २०२४ या दरम्यान कंपनीचे कर्मचारी उमाकांत आधार विसावे यांनी एकूण १२२ कर्जदारांकडून ८ लाख ९७ लाख ७७४ रुपयांची कर्जवसुली केली. मयूर मिठाराम बडगुजर याने २२ कर्जदाराकडून २ लाख १५ हजार ७६३ रुपयांची वसुली केली.
हि वसुली बँकेला जमा न करता दोघांनी मिळून एकूण ११ लाख १३ हजार ५१० रुपयांचा अपहार केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि. भगवान शिरसाठ हे करत आहेत.