भडगाव | दि. ०६ ऑगस्ट २०२४ | तालुक्यातील कजगाव येथे आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आलायं. कजगाव पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फरार झालेले होते.
भारती माधव पाटील या रविवारी जुन्या गावातील बाजारासाठी इतर महिलांसह आठवडे बाजारात गेल्या होत्या. बाजार करून घरी परतत असताना गळ्यातील पोत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजारात चार ते पाच अनोळखी मुले या महिलांच्या आजूबाजूला फिरत असल्याची माहिती या महिलेने दिली.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कजगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी बाजारात फेरफटका मारला. चोरट्यांनी हाथसफाई करत ही पोत लांबवली. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.