जळगाव (प्रतिनिधी) : लोखंडी दरवाजे तयार करणाऱ्या कंपनीतून तेथेच काम करणाऱ्या परेश अरुण बडगुजर (रा. सुप्रीम कॉलनी) या कामगाराने एक लाख ४१ हजार ८१८ रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही चोरी १७ ते ३० जुलैदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील इन्फिनिटी इंटरप्राईजेस प्रा.लि. कंपनीत झाली. कामगार परेश बडगुजर याने ६१ हजार ९५० रुपये किमतीचे मार्टाईज लॉक, २० हजार १०० रुपये किमतीचे टॉवर बोल्ट, ९ हजार ८४० रुपयांचे ग्लास टेप, ३९ हजार ९२८ रुपयांचा कडीकोयंडा, १० हजारांचे दरवाजाचे हँडल असा एकूण एक लाख ४१ हजार ८१८ रुपयांचे साहित्य चोरट्याने चोरून नेले.
या प्रकरणी व्यवस्थापक जितेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास लावून ही चोरी कामगारानेच केल्याचे निष्पन्न केले होते.