लखनौ येथील घटना ; १६ जणांना अटक
लखनौ (वृत्तसंस्था ) ;- गोमतीनगरमधील पूरग्रस्त अंडरपासजवळ एका महिलेचा छळ केल्याप्रकरणी लखनौ पोलिसांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे आणि 16 जणांना अटक केली आहे. गुडघाभर पाण्यातून जाणाऱ्या बाईकवरील महिलेची छेड काढण्यात आल्याचा व्हिडीओ देशभरामध्ये व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने स्थानिक पोलीस आयुक्त (DCP), अतिरिक्त पोलीस आयुक्त (ADCP), सहाय्यक पोलीस उपायुक्त (ACP) या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनमधील प्रभारी निरीक्षक, पोलीस स्थानकाचे प्रमुखांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच सदर घटना ज्या पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या भागात घडली त्या गोमती नगर पोलीस स्टेशनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
https://twitter.com/i/status/1818618356074705185
एका जोडप्याची बाईक अडवून या लोकांनी मागे बसलेल्या महिलेला पाण्यात पाडून तिची छेड काढली. सुरुवातीला हे दोघे बाईकवरून जात असतानाच त्यांच्यावर या तरुणांनी पाणी उडवलं. नंतर दुचाकी पकडून धरली. त्यानंतर मागे बसलेल्या महिलेला मागून खाली खेचत पाण्यात पाडले. ही दुचाकीही पाण्यात पडली. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडताना हाताच्या अंतरावर पोलीस उभे होते. तरी मस्करी सुरू असल्याचे समजून त्यांनी हस्तक्षेप केला नाही असे काहींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त , साहाय्यक पोलीस उपायुक्त या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनमधील प्रभारी निरीक्षक, पोलीस स्थानकाचे प्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता सदर घटना ज्या पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या भागात घडली त्या गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली तेव्हा ऑन ड्यूटी असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनी व्हीडीओच्या आधारे महिलेची छेडछाड करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. लखनौमध्ये बुधवारी (३१ जुलै) जोरदार पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. त्यातही ताज हॉटेलच्या ब्रिजसमोर तरुणांचे एक टोळके लोकांना त्रास देत होते. पाऊस सुरू असताना आणि पाणी साचलेले असताना स्थानिकांना हा त्रास सहन करावा लागला. हे तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुली, महिला, वयस्कर लोकांना धक्काबुक्की करत होते. दुचाकीवरून जाणाऱ्यांवर पाणी उडवणे, दुचाक्यांना धक्का देणे, कारची दारे उघडून आत पाणी टाकणे असे प्रकार हे लोक करत होते.