वावडदा गावाजवळील घटना
जळगाव | दि. ०१ ऑगस्ट २०२४ | जळगाव पाचोरा रोडवरील वावडदा गावाजवळील वळणावर लक्झरी बस व डंपर यांचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या अपघातात लक्झरीतील १० प्रवाशी जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा ते जळगाव अशी प्रवाशी ने आण करणारी लक्झरी (एमएच १९ वाय ३३५९) ही पाचोरा येथून प्रवाशी भरून जळगावच्या दिशेने जात असतांना गुरूवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता समोरून पाचोरा दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत लक्झरीमधील 16 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. या अपघात लक्झरी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर वावडदा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले. त्यानुसार रूग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे
इंदुबाई बिरबल राठोड (वय ४०), बिरबल हरसिंग राठोड (वय ५०), करण बिरबल राठोड (वय १८, सर्व रा. नांद्रा ता. पाचोरा), सुवर्णा भूषण पाटील (वय २८, नांद्रा ता. पाचोरा), श्रीकृष्णा हरी माळी (वय ५२), अंजना श्रीकृष्ण माळी (वय ४५,दोन्ही कुऱ्हाड ता. पाचोरा), प्रवीण सुरेश पाटील (वय ३५, रा. नांद्रा ता. पाचोरा), मनीषा विनोद पाटील (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा), रंजना पुना पाटील (वय ४५, रा. रा. नांद्रा ता. पाचोरा), पूजा कैलास पवार (वय ३८, रा. रा. नांद्रा ता. पाचोरा), सुरेखा नरेंद्र पाटील (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा), आशा अशोक पाटील (वय ४०,रा. नांद्रा ता. पाचोरा), आबा वसंत पाटील (वय ५०,रा. नांद्रा ता. पाचोरा).