जळगाव | दि. २८ जुलै २०२४ | जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मनीषा भिडे व रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मंजुषा देशमुख उपस्थित होते.
अनुभूती निवासी स्कूलने “जळगाव तालुका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत २०२४-२५” मध्ये चार विजेतेपदे जिंकली. स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात तसेच १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त, १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या श्रेणींमध्ये चौथे स्थान अनुभूती स्कूलने पटकावले.
तालुकास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघाची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांना मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया, सह प्रशिक्षक दीपिका ठाकूर, तसेच क्रीडा शिक्षक शशिकांत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. विजयी झालेल्या संघ व निवड झालेल्या खेळाडूंचे अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास , व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यशस्वीतेसाठी मुख्य पंच किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जाझीब शेख, पुनम ठाकूर, ईशांत साळी, हमजा खान, अक्षद पगारीया, मेहर लाडके, ओम अमृतकर, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, आरोही परांजपे, चिन्मय पाटीदार, मशरुफ शेख, अर्ष शेख यांनी सहकार्य केले.
अंतिम निकाल असा
१७ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल वि. वि. रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल स्कोअर :- (२-१)
१७ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल स्कोअर : – (२-१)
१९ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय स्कोअर :- (२-०)
१९ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी पब्लिक स्कूल स्कोअर :- (२-०)