जळगाव | दि.२८ जुलै २०२४ | माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पिंप्राळा परिसरात गरजूंना छत्री, टी-शर्ट आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला.
यावेळी माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, सनिल महाजन, पियुष गांधी, अमित जगताप, यश सपकाळे, महिला आघाडीच्या निलू इंगळे, मनीषा पाटील, जया तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उद्धव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे नियोजन केल्या असल्याचे कुलभूषण पाटील बोलत होते, यापुढेही असेच सामाजिक कार्य जळगावकरांसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्री व टी-शर्ट वाटप उपक्रमाची सुरवात पिंप्राळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्याल येथून करण्यात आली. येत्या ८ दिवसात शहरातील प्रत्येक भागात १० हजारांपेक्षा जास्त छत्री व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच युवासेना व के.पी.फाउंडेशनच्या मदतीने शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात येणार आहे.