जळगाव | दि.२६ जुन २०२४ | पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित असून, सदर शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण होणेसाठी, श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मागणी नुसार तसेच तत्कालीन कृषिमंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती,
सदर समितीकडे पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या ११०२२ शेतकऱ्यापैकी ८१९० शेतकऱ्यांनी दाद मागितली असता, समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या ६६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळणे बाबत “केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची दिल्ली येथे भेट घेतली.
तसेच जळगांव जिल्हा हा महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेत असून, केळी साठी आवश्यक सुपिक जमीन एकूण जवळजवळ १ लाख हेक्टर येथे उपलब्ध असून, जिल्ह्यातील केळीची अनेक देशात मागणी असल्याने जळगांव जिल्ह्याचा “फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम” (हॉर्टीकल्चर क्लस्टर) च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश होणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे मागणी केली.