जळगाव | दि.२६ जुन २०२४ | जुलै महिन्यात राज्यात विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून त्या जागेवर बंजारा समाजातील २५ वर्षापासून बंजारा व विमुक्त भटक्या समाजासाठी अहोरात्र झटणारा सामाजिक कार्यकर्ता श्रावण चव्हाण (नंदुरबार) यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक, बंजारा टायगर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी मागणी केली आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्रातून बंजारा समाजास एक जागा न मिळाल्यास महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या २८८ जागा अखिल भारतीय बंजारा सेना लढवेल असा इशारा पत्रकार द्वारे देण्यात आला आहे. बंजारा समाज हा साधारणतः ग्रामीण भागात तांडा वस्ती करुन राहतो. बंजारा समाजाच्या तांड्यांचा अजुनपर्यंत मुलभूत सुविधा अंतर्गत पाहिजे तसा विकास झालेला नाही. म्हणून श्रवण चव्हाण यांना विधान परिषदेवर घेवुन बंजारा समाजाची नाराजी दुर करण्यात यावी.
आजपर्यंत महाराष्ट्रात बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक हे होवुन गेले, त्यानंतर विधान परिषद व विधान समेत बंजारा समाजाची बाजू मांडण्यासाठी नेते मंडळी नसून बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक, बंजारा टायगर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, एकनाथ जाधव, किशोर जाधव, चेतन जाधव आधी पदाधिकाऱ्यांच्या पत्रकावर सह्या आहेत.