जळगाव | दि.२३ जुन २०२४ | श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी योग दिवसाला उपस्थित होते.
सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले व शिक्षकांनी योगाभ्यास शिकवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले.