• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रशासनाची तयारी पूर्ण

मतमोजणी कक्षात मोबाईलवर सक्ती बंदी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 31, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रशासनाची तयारी पूर्ण

जळगाव, दि.३१ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी दि.४ जून रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ४ जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल.

८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

गुरुवार दि.३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगितली. ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल.मतमोजणी स्थळी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.मतमोजणी स्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे.

ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही. मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीना मोबाईल आणता येणार नाही याची नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीं समोर सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्त्याना शांतता राखण्याचे आवाहन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.

प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होण्याआधी टपाली मतमोजणी होणार आहे. किमान एक फेरी २० मिनिटांची असणार आहे. उमेदवारांना निवडणूकीचा अंतिम खर्च निकालानंतर ३० दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. या साठी २७ जून रोजी अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तर ३० जून रोजी खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे.


Next Post
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group