• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रदीपकुमार कळसकर यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 27, 2024
in जळगाव जिल्हा
0
प्रदीपकुमार कळसकर यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

जळगाव, दि. २७ – पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूल येथे हिंदी विषय शिक्षक आणि हिंदी विभाग-प्रमुख या पदावर कार्यरत असलेले शिक्षक प्रदीपकुमार सुरेश कळसकर यांना ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि राष्ट्रभाषा हिंदी सेवा संघ-हैदराबाद द्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत मानद डॉक्टरेट पदवी देवून गौरविण्यात आले. गेल्या १६ वर्षात हिंदी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य व हिंदी या अधिकृत भाषेतील तांत्रिक आणि वैज्ञानिक शब्दांचा शोध तसेच भारतीय भावनांसाठी ते करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ही पदवी देण्यात आली आहे. ते शिरसोली येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक सुरेश कळसकर यांचे सुपुत्र आहेत.

डॉ. प्रदीपकुमार कळसकर हे पारोळा येथील एकमेव (सीबीएसई) बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये हिंदी विषयाचे शिक्षक व हिंदी विभाग-प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शाळेत इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवण्यासोबतच सामाजिक जीवनात हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देण्याचे कामही ते करत आहेत. हिंदी भाषेचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनजागृती करत आले आहेत.

हिंदी भाषा, राजभाषा हिंदी, राष्ट्रभाषा हिंदी, हिंदी समानार्थी शब्द, भारतीय ज्ञान परंपरा इत्यादींचा प्रसार सोशल मीडियावर फेसबुक पेज/व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. तसेच भारतीय वंशाच्या हिंदी भाषेतील शब्द, संस्कृत, उर्दू, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदीतील लॅटिन शब्दांच्या व्युत्पत्तीवर संशोधन कार्य सुरू ठेवले आहे, ज्यामध्ये एक दशलक्ष हिंदी समानार्थी शब्द शोधण्यात आले आहेत.

त्यांची सेवा आणि कार्य लक्षात घेऊन त्यांना ग्लोबल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अमेरिकेकडून आणि “राष्ट्रभाषा हिंदी सेवा संघ-हैदराबाद यांच्याकडून दि.२५ मे २०२४ रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. दरम्यान हैदराबाद येथे राष्ट्रभाषा सेवा संघ पुरस्कारांसह आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी डॉ. सुनील दुबे, मानद डॉ. सौरभ पांडे, मिस एशिया युनिव्हर्स पूजा निगम, डॉ. अभिषेक कुमार, दिव्य प्रेरक कहानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित जैन, मेरठचे डीन सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या वतीने आशिया बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे संचालक डॉ. डी.आर. रेवाला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. यावेळी ४५ जणांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय हिंदी सेवा सन्मानाने ही सन्मानित करण्यात आले.


 

Next Post
रामदेववाडी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय.. – आ. एकनाथराव खडसे

रामदेववाडी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय.. - आ. एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add