• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त ; ७५ लाखापेक्षा अधिकचा मुद्दामाल हस्तगत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई ; पाच आरोपीना अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 5, 2024
in गुन्हे
0
जळगावात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त ; ७५ लाखापेक्षा अधिकचा मुद्दामाल हस्तगत

जळगाव, दि.०५ – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी एमआयडीसी भागातील के-१० सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला असुन ७५ लक्ष ६४ हजार २०० रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया करणे सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. ४ मे , २०२४ रोजी मध्यरात्री २:३० वाजेसुमारस एमआयडीसी भागातील के-१० सेक्टर मधील मंदार आयुवैदिक प्रोडक्ट या कंपनीत छापा मारला असता शितपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे व रॉकेट संत्रा नामक मद्याची अवैधरित्या निर्मिती करुन ते बाटलीत भरताना मिळून आले.

या प्रकारणात एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १५ लाख ७५ हजार किमंतीच्या ४५ हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, ३० लाख ३० हजार किमंतीच्या देशी मद्याचे भरलेले बॅरल, ३ लाख किमंतीच्या १ लाख रिकाम्या बाटल्या, ६ लाख किंमतीचे लेबल पट्टी मशिन, ६ लाख किंमतीचे बुच सिल बंद करण्याचे मशिन, ५ लाख रुपये किंमतीचे पाणी शुद्धीकरण मशिन, ४ लाख ५० हजार किंमतीचे चार चाकी वाहन यासह किरकोळ व इतर साहित्य असा एकूण ७५ लाख ६४ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही राज्य उत्पादक शुक्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यंवशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शना खाली निरिक्षक डी. एम. चकोर, एस.बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी.आर.शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी.तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी.सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास डी.एम.चकोर हे करीत आहे.

Next Post
शिंपी समाजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर

शिंपी समाजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर

ताज्या बातम्या

जळगाव मनपा भाजप गटनेतापदी प्रकाश बालाणी; नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा भाजप गटनेतापदी प्रकाश बालाणी; नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण

January 21, 2026
जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश
जळगाव जिल्हा

जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश

January 21, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

January 20, 2026
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी
Uncategorized

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

January 20, 2026
जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका
खान्देश

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

January 20, 2026
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group