• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यातील 10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 13, 2021
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील 10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जयपूर येथील राष्ट्रीय सनियंत्रण संस्था भारती विकास संस्थेतर्फे मनोज दीक्षित व श्रीमती मोनिका हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (भूसंपादन), कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते (रोहयो), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे (ग्रामपंचायत), भूमीअभिलेख विभागाचे अधीक्षक श्री. मगर, तहसीलदार जितेंद्र कुवर, बोदवड, चोपडा, पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखाधिकारी कैलास सोनार आदि उपस्थित होते.

श्री. दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील समिती 20 सप्टेंबर, 2021 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील विविध दहा गावांना भेटी देवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, एनएसईपी, आजिविका, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, भूमीअभिलेख, संसद आदर्श ग्राम योजना आदी योजनांचा आढावा घेतील. तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ही समिती भडगाव तालुक्यातील कोळगाव, पिचर्डे, कोठली, पाचोरा तालुक्यातील लोहटार, जामनेर तालुक्यातील खातगाव, माळपिंप्री, बिलवाडी आणि बोदवड तालुक्यातील जलचक्र, साळशिंगी, शिरसाळे या दहा गावांना भेट देवून पाहणी करणार आहे, असे समितीचे समन्वय अधिकारी श्री. लोखंडे यांनी कळविले आहे.

Next Post
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात
आरोग्य

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

June 25, 2026
जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार
क्रिडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
जळगाव जिल्हा

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

June 25, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group