जामनेर, दि.०३ – महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची सासुरवाडी जामनेर तालुक्यातील आहे. गुरुवारी श्री पाटील जामनेर तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जामनेर तालुक्याचे जावई असलेल्या श्रीराम पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी परिवर्तन करण्याची इच्छा मतदारांनी बोलून दाखविली.
रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीराम पाटील यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात बेटावद बुद्रुक, बेटावद खुर्द, वाघारी, रांजणी, कापूसवाडी, देऊळगाव गुजरी, तोरणाला, तोंडापूर, फतेपुर, किन्ही, भारुडखेडा, वाकोद, पहुरपेठ, पहुर कसबे, पाळधी येथील ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डि के पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे प्रमोद नाना पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील
शिवसेना उबाठा गट पक्षाचे तालुकाप्रमुख ऍड ज्ञानेश्वर बोरसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील, एस टी पाटील, डॉ. प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, प्रभाकर पाटील, मुलचंद नाईक, मदन जाधव, पुंडलिक पाटील, संदीप नेरिया, रोहन राठोड, राजेंद्र पाटील, योगेश भाई, सागर कुमावत, परमेश्वर जव्हारे, अविनाश पाटील, गोपाल कदम, भूषण गरुड, सुभाष ठोंबरे, विष्णू सोनवणे, संजय उंबरकर, धर्मराज पाटील यांच्यासह ग्रामस्थव व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.