जळगाव, दि.२२ – जळगाव इंडियन मेडीकल असोसिएशनचा पदग्रहण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. आयएमए जळगावचे नूतन अध्यक्षपदी डॉ. सुनील गाजरे आणि सचिवपदी डॉ.अनिता भोळे यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयएमएचे नूतन पदाधिकारी कटीबध्द असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
जळगाव आयएमएचा पदग्रहण सोहळा शनिवार उत्साहात पार पडला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी बोलतांना सांगितले की, अध्यक्षपदी डॉ. सुनील गाजरे आणि सचिवपदी डॉ. अनिता भोळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. अनिता भोळे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. कोणतेही काम त्यांनी हाती घेतले की त्यात त्यांची समर्पण वृत्ती दिसून येते. त्यांना डॉ. अनिल पाटील, डॉ. विलास भोळे आणि डॉ. स्नेहल फेगडे यांचे मार्गशर्दन लाभणार आहे.
जळगाव आयएमएचे ७०० सदस्य आहेत. त्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी डॉ. सुनील गाजरे आणि डॉ. अनिता भोळे यांच्यावर आहे. डॉक्टरांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्यावर होणारे हल्ले, रूग्णालयाचे होणारे नुकसान यावर प्रतिबंध येण्यासाठी केंद्रीयस्तरावर कायदा व्हावा म्हणूनही डॉ. अनिता भोळे कार्यरत राहणार आहेत. भावी काळासाठी डॉ. सुनील गाजरे आणि डॉ. अनिता भोळे यांना शुभेच्छा असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाभिमुख आणि सार्वजनिक स्वास्थ्य विषयी उपक्रम हाती घेऊन जळगाव शहरात जनजागृती करण्याचा मानस डॉ. अनिता विलास भोळे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी डाॅ.रुचा नवाल, डॉ. नीलम पाटील यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. अविनाश भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.
डॉ. केतकी पाटील यांनी केले अभिनंदन..
इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावच्या सेक्रेटरी पदी डॉ. अनिता विलास भोळे यांच्या रूपाने एका महिला डॉक्टरांची निवड झाली, त्याबद्दल गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आणि आयएमए सदस्य डॉ केतकी पाटील यांनी डॉ. अनिता विलास भोळे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी हृदयरोग तज्ञ् डॉ वैभव पाटील हे देखील उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी..
त्या सोबतच नूतन कार्यकारणीत डॉ. पंकज पाटील – कोषाध्यक्ष, डॉ. सुशील राणे व डॉ. धीरज चौधरी – सह सचिव, डॉ. विनोद जैन – जनसंपर्क अधिकारी, डॉ. पंकज शहा, डॉ. किशोर पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ. राहुल मयुर, डॉ. सारिका पाटील, डॉ. अनघा चोपडे – कार्यकारणी सदस्य म्हणून पदभार स्विकारला. या व्यतिरिक्त अन्य ८ उपसमितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनीही पदभार स्वीकारला. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्यस्तरीय इतर समितीवर असणाऱ्या डाॅ. जितेंद्र नारखेडे, डाॅ. अंजली भिरुड, डाॅ. लीना पाटील, डाॅ. रागिणी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.