• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 31, 2024
in जळगाव जिल्हा
0
मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सहभाग

जळगाव, दि.३१ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान आज एरंडोल येथे सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला.

एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, मारवाडी गल्ली, भगवा चौक, मेन रोड (बाजार पेठ) मार्गे तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच विविध ठिकाणी थांबून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांना मतदान करायला सांगून इतरांनाही प्रेरीत करण्याचे आवाहन केले.

या रॅलीत उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, पोलीस निरीक्षक संतोष गोराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, न. प. पारोळा, राजेंद्र महाजन, गटशिक्षणाधिकारी, तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, नायब तहसीलदार बी.एस. भालेराव तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
ज्या मार्गावर तुम्हाला देव सापडेल तो मार्ग स्वीकारा.. – संतश्री विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज

ज्या मार्गावर तुम्हाला देव सापडेल तो मार्ग स्वीकारा.. - संतश्री विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज

ताज्या बातम्या

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add