जळगाव, दि.२८ – अभिजात संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे शहरातील विविध ठिकाणी नियमितपणे संगीत सभेचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत होलिकोत्सवाच्या निमित्ताने रंगपंचमीच्या पू्र्वसंध्येला “रंगी रंगला श्रीरंग” या संगीत मैफिलीचे आयोजन शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजता शहरातील भाऊंचे उद्यान , एम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाचे गुणी कलावंत होळी उत्सवावर आधारित शास्त्रीय बंदिश, उपशास्त्रीय गीते, भाव संगीत व चित्रपट संगीत अश्या विविध प्रकारच्या गीतांचे सादरीकरण करणार आहेत.
जळगावकर रसिकांसाठी हा कार्यक्रम खुला असून रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी स्वरांचा सप्तरंगीय आविष्कार अनुभवण्यासाठी कार्यक्रमास अवश्य उपस्थिती द्यावी, असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.