जळगाव, दि.०२ – येथील तुळजाई बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण जळगाव येथे महासांस्कृतिक महोत्सव -२०२४ हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनाचे दुष्परिणाम पथनाट्यद्वारे विद्यार्थ्यांच्या समोर सादर करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी पथनाट्य सादर करणाऱ्यांचे आभार मानून एक चांगल्या उपक्रमाद्वारे आपण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या माध्यमातून जनजागृती करत असल्याचे सांगतले. तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम कसे होताय याबाबत समजावून सांगितल.
पथनाट्य सादरीकरण भूषण, वंजारी, शैलेश दुबे, करण मानकर, वैशाली कोळी, ओम थोरात, तुषार भटकर आदींनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्वक प्रतिसाद दिला. कार्यक्रमात शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी सहकार्य केले.