जळगाव, दि.०२ – शहरातील प्रभाग क्र. १० मधील पिंप्राळा परिसरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला.
यावेळी आमदार राजुमामा भोळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना जळगाव शहरात विकास कामांचे “विकासपर्व” सुरू असून सर्व विकास कामे पूर्ण होत आहेत, उर्वरित कामे देखील लवकरात लवकर पूर्ण होतील याची ग्वाही दिली.
यावेळी माजी नगरसेवक आबा कापसे, सुरेश सोनवणे, विजय पाटील, अतुल बारी, शक्ती महाजन, नीतू परदेशी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.