• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास राज्य शासन बांधील.. -पालकमंत्री गुलाबराव पाटील

पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2021
in कृषी
0
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास राज्य शासन बांधील.. -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि.10 – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासन बांधील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी जामनेर तालुक्याचा दौरा करून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचेसोबत माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, सामाजिक कार्यकर्ते संजय गरुड यांच्यासह पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी जामनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, हिंगणे न क व तोंडापूर येथील नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले, की चाळीसगाव व जामनेर तालुक्यातील शेतीच्या नुकसानी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. राज्याच्या पुनर्वसन मंत्र्यांनी पंचनाम्यात वेळ न घालवीता तत्काळ मदतीचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. पीक विमा नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाईन होण्यात तांत्रिक अडचण येत असल्याने ऑफलाईन स्वीकारले जातील. याबरोबरच राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत देण्यास शासन बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील यांनी या दौऱ्यात नुकसान झालेल्या पिकांची तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी करुन यंत्रणेला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. आमदार गिरीश महाजन यांनीही वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे सांगून मदतीचे आश्वासन दिले. यावेळेस तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. व्ही. कवडदेवी, कृषीसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.


 

Next Post
सुरमाज फाउंडेशन तर्फे गरीबांसाठी पेन्शन

सुरमाज फाउंडेशन तर्फे गरीबांसाठी पेन्शन

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add