• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सहा दिवसीय मैत्र महोत्सवाचा भाऊंच्या उद्यानात प्रारंभ

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेतर्फे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
सहा दिवसीय मैत्र महोत्सवाचा भाऊंच्या उद्यानात प्रारंभ

जळगाव, दि.२४ – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेतर्फे आयोजीत मैत्र महोत्सवाचा आज भाऊंचे उद्यानात एम्पी थेटअरमध्ये ‘बाजे रे मुरलिया’ या बासरी वादनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. कलश हस्तांतरित करून महोत्सवाचे अनोखे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आरती हुजूरबाजार यांच्या उपस्थितीत अनिल शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, छबीराज राणे, होरीलसिंग राजपूत, सोनाली पाटील, नारायण बाविस्कर, सुदिप्त सरकार यांच्या हस्ते कलश ‘मैत्र महोत्सवाच्या प्रमुखांकडे हस्तांतरित केले. त्यात डाॅ. रेखा महाजन, नंदूशेठ अडवाणी, इंजि. प्रकाश पाटील, स्वरूप लूंकड, शैलेश कोलते , विनोद पाटील, मानसी गगडाणी, पारस राका हे मैत्री महोत्सवाचे प्रमुख आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रेखा महाजन यांनी केले. जळगाव शहराचे सामाजिक स्वास्थ,सांस्कृतिक पाया भक्कम करण्यासह स्थानिक कलावंतांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचे काम परिवर्तन करते. कला आणि साहित्यावर निस्सम प्रेम करणारे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रेरणेतून ही संस्था फुलली. कलेच्या माध्यमातून जळगाव शहर सुंदर व्हावं हे मोठेभाऊंना वाटायचे ह्याच संस्कारातून अशोकभाऊ सह संपूर्ण जैन परिवार कलावंताच्या पाठिशी उभे असतात असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

वैष्णव जन तो हे ने बाजे मुरलियाची सूरवात झाली. धानी रागातील धून गोरी तेरा गा त्यानंतर यमन रागावरील गीते त्यात बाजे मुरलिया ने रसिकांना वेगळी अनुभूती मिळाली.मिश्र शिवरंजनी, हिरो यानंतर पहाडी धुनने कार्यक्रमाची सांगता झाली. बाजे रे मुरलिया या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन संस्थेची असून दिग्दर्शन ज्येष्ठ बासरी वादक संजय सोनवणे यांनी केले आहे.

आज सादर झालेल्या कार्यक्रमात वीस बासरी वादकांचा सहभाग होता. यात गणेश पवार, दिनेश बि-हाडे, रविंद्र बारी, पियूष बि-हाडे, यश महाजन, कृष्णा कोलते, हेमंतकुमार चौधरी, राजेश राठोड, सतचित जोशी,, सुमित सोनवणे, कुशलपाल पाटील, मंगेशा सोनवणे, प्रक्षिक सपकाळे, क्रिष्णा कोलते, देवेश काळे, सुरेश दाभाडे, अमोल वाघ, तुषार हिवाडे हे कलावंत बासरी वादनात सहभागी होते. आॕर्गनवर अनिल तायडे, ॲक्टोपॕडवर दिनेश ठाकूर, ढोलक हॕन्डसोनीकवर जय सोनवणे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन मानसी जोशी यांनी केले. महोत्सवात उद्या दि.२५ ला अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचा ‘भक्ती संगीत संध्या’ ह्या कार्यक्रम होणार आहे.

 


 

Next Post
तीन गावठी पिस्तोल व जिंवत काडतुसह एकास अटक

तीन गावठी पिस्तोल व जिंवत काडतुसह एकास अटक

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group