• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त.. – कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त.. – कुलगुरू डॉ. शिर्के

कोल्हापूर/जळगाव, दि.२४ – गांधीवादी मूल्यशिक्षण या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच अनेक उपक्रम गांधी अभ्यास केंद्रामार्फत येत्या वर्षभरात राबविण्यात येऊ शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन यांच्यादरम्यान आज सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फौंडेशनच्या वतीने संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल, असोशिएट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला आणि परीक्षा नियंत्रक गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, जळगावच्या गांधी संशोधन केंद्राला अर्थात गांधी तीर्थाला गतवर्षी भेट देऊन आल्यापासून या संस्थेसमवेत संयुक्तपणे काही उपक्रम राबविता येतील का, याविषयी चिंतन सुरू होते. त्यास आजच्या सामंजस्य कराराच्या रूपाने मूर्तरूप लाभले, ही समाधानाची बाब आहे. महात्मा गांधी यांचा मूल्यविचार, मूल्यशिक्षण आणि नई तालीम आदींवर आधारित दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक ई-कन्टेन्टची निर्मिती संयुक्तपणे करता येईल. विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षकांनी गांधीतीर्थ येथे जाऊन तेथील फेलोशीप सह शैक्षणिक बाबींचा लाभ घ्यावा. क्रमिक अभ्यासक्रमाच्या जोडीला गांधी विचारांवर आधारित कृतीशील उपक्रमही राबविले जावेत, त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेलाही सामावून घेतले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. गीता धर्मपाल म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार होणे ही गांधी रिसर्च फौंडेशनसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठासमवेत फौंडेशनला संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ शकतील. गांधींची प्रस्तुतता अधोरेखित करणारे विविध उपक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आदींचे आयोजनही करता येऊ शकेल.

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वाटचालीविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी तर गांधी रिसर्च फौंडेशनच्या वतीने संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. धर्मपाल यांनी स्वाक्षरी केल्या. सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. तर, फौंडेशनच्या वतीने कुलगुरूंना गांधी पुतळा आणि सुतीहार प्रदान करण्यात आला. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.


Next Post
किल्ले रायगडावर तुतारी निशाणी छत्रपतींना समर्पित

किल्ले रायगडावर तुतारी निशाणी छत्रपतींना समर्पित

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group