• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने केल्या मान्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोसंबीचे ज्यूस पाजून उपोषण सोडविले

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 27, 2024
in राज्य
0
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने केल्या मान्य

मुंबई, दि.२७ – मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीवर येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील शिवाजी चौकात भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली. त्यासोबत त्यांना मोसंबीचे ज्यूस पाजून त्यांचे उपोषणही सोडवले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला. पाटील यांनी प्रेमाने भरवलेला पेढा खाऊन तोंड गोड केले.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली आहे. तसेच मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत देखील तयारी दर्शवली आहे. यासोबतच मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे.

हा विजय हा सकल मराठा समाजाचा आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून झुंजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय आहे. तसेच गेले सात दिवस कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना कौतुक आणि अभिनंदन केले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

Next Post
युरिया गोल्डचे भारतातील पहिल्या रॅकचे जल्लोषात स्वागत

युरिया गोल्डचे भारतातील पहिल्या रॅकचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add