जळगाव, दि.०५ – आ. सुरेश भोळे यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगांव येथे दहा संगणक व प्रिंटर वितरण करण्यात आले.
आर्थिक साक्षरतेसाठी तांत्रिक साक्षरता अत्यंत महत्वाची आहे, असे मत यावेळी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी बोलताना व्यक्त केले.
या प्रसंगी तंत्र अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय दिपक ठाकूर, जिल्हा अधीक्षक कार्यालयाचे चंद्रकांत पाटील, कार्यालय अधीक्षक अजय भारते आदींसह कर्मचारी उपस्थित होते.