जळगाव, दि.२५ – महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे ३९ व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस जळगावातील गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ. हर्षवर्धन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी परिषदेचे संचालक डॉ. अनिल खडके, जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भूषण झवर, को- चेअरमन डॉ. जितेंद्र कोल्हे, सायंटिफिक चेअरमन डॉ. विनोद जैन, ज्येष्ठ सर्जन डॉ.प्रकाश कोचर, डॉ.मिलिंद कोल्हे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
शुक्रवार २७ रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते व असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉ. नारायण करणे, डॉ. सुनील नाहाटा, डॉ. हर्षवर्धन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ३२ वर्षानंतर जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनला यजमानपदाची संधी मिळाली आहे. परिषदेत राज्याबाहेरील नऊ तज्ञ मार्गदर्शकांसह राज्यातील ५०० अस्थिरोग तज्ञांचा सहभाग असणार आहे असे सांगितले. परिषदेसाठी स्व. डॉ.अनिल आचार्य, डॉ. प्रताप जाधव, डॉ.घनश्याम कोचुरे यांचे नाव तीन सभागृहांना देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ.संजय पाटील, डॉ.नितीन धांडे, डॉ.अनुप पाटील, डॉ हर्षिता नाहाटा, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते आदी अस्थिरोग तज्ञांची उपस्थिती होती.