• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना

शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना

जळगाव, दि.२१ – देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय हुतात्मा दिन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले.

पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते‌. पोलीस परेडचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले‌‌. दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना शहीद झालेल्या देशभरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. या शहिदांमध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़. २९ जून २०२३ रोजी एरंडोल येथे कर्तव्य बजावत असतांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर, पोलीस नाईक अजय चौधरी यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व मदतनिधीचा धनादेश देत सात्वंन करण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकात गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.


 

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गरबा रास महोत्सव साजरा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गरबा रास महोत्सव साजरा

ताज्या बातम्या

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add