जळगाव, दि.०७ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे १० सप्टेंबर रोजी जळगाव शहरात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना जळगाव महानगरची बैठक महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दिनांक १० सप्टेंबर रोजी जळगाव दौऱ्यावर येत असून पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मानराज पार्कच्या मैदानावर जाहीरसभा होणार आहे. दरम्यान शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून सभा यशस्वी होईलच असा आशावाद महानगर प्रमुख शरद तायडे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर समन्वयक अंकुश कोळी, संतोष पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, कोमेश सपकाळे, शाकीर खान, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, निता सांगोले, पिंटू सपकाळे, निलेश ठाकरे बबलू रंग्रेज शोएब खाटीक निलेश तायडे निलेश पाटील दीपक जगताप कार्यालय प्रमुख संजय सांगळे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.