• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 7, 2023
in शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

जळगाव, दि.०७ – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलचा स्थापना दिन व ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा सुरू केली. सोळा वर्षापासून सुरू असलेल्या अनुभूती स्कूल च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘फेशर्स डे’ साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत ज्योती जैन, शोभना जैन, डाॕ.भावना अतुल जैन, अंबिका अथांग जैन, प्राचार्य देबासिस दास यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरक संवाद साधला. अनुभूती स्कूल हे एक कुटुंब असून येथे फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही, तर आपल्या कलागुणांमध्ये निपूण होण्याची संधी मिळते. कला, साहित्य, स्पोर्टस यासह सांस्कृतिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच उद्देश अनुभूती स्कूलचा असल्याचे अतुल जैन म्हणाले. प्राचार्य देबासिस दास यांनी अनुभूती स्कूलच्या विकासात्मक वाटचालीबाबत सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला नृत्यासह गणेश वंदना विद्यार्थ्यांनी सादर केली. सारे जहाँ से अच्छा हे देशभक्तीपर गीत, लकडी की काठी, हरे क्रिष्णा हरे रामा अशा एकाहून एक गीतांसह मेमिक्री, भांगडा नृत्य, तबला वादन, मानवतेचा संदेश देणारे ‘हिच आमची प्रार्थना’, केदारनाथ व ईच्छा पूर्ती एकांकिका अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. सोशल मीडीयाचा प्रभाव या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिकेतून प्रबोधन केले. 5 व 6 च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले महादानी नाटक विशेष ठरले. ‘फुलो ने मिट्टीसे पुछा..’ हे पर्यावरण गीत सादर केले. राजस्थानच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला.

Next Post
वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add