• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे.. - आ. किशोर दराडे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 10, 2023
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

जळगाव, दि.१० – विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि अपेक्षित यश असे हे समीकरण असून विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे शिक्षक आ. किशोर दराडे यांनी केले.

समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण व जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आ.किशोर दराडे उपस्थित होते. प्रसंगी मंचावर कबचौ उमविच्या व्यवस्थापन परिषद सदस्या सुरेखा पालवे, मनपा उपायुक्त गणेश चाटे, जेष्ठ कवी वा.ना.आंधळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पीएसआय दत्तात्रय पोटे, अमळनेर नगरपरिषदेचे लेखापाल चेतन गडकर, सहायक अभियंता ईश्वर पढार, उपसरपंच आनंदा सांबळे, विष्णू चकोर, जामनेरच्या नगरसेविका किरण पोळ, नगरसेवक राजेंद्र पाटील, अशोक लाडवंजारी, श्रीराम मंदिर संस्था अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.

प्रस्तावनेमधून संघटनेच्या कामाविषयी आढावा घेऊन कार्यक्रमाविषयी अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी माहिती दिली. यानंतर शिक्षक आ. किशोर दराडे यांना समाज भूषण पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, सेवानिवृत्ती कर्मचारी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यूपीएससी परीक्षा प्राप्त गौरव गायकवाड आणि संगणक अभियांत्रिकी परीक्षेतील विजेती माधुरी घुगे यांचाही सत्कार झाला.

तसेच, आ. दराडे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसंगी आ. किशोर दराडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअर केल्यानंतर समाजासाठी देणं लागतं. या भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रशांत नाईक यांनी केले ,सूत्रसंचालन उमेश वाघ यांनी तर आभार महादू सोनवणे यांनी मानले.

भरत नागरे, सुनील लोंढे, विलास सोनवणे, सुरेश सांगळे, रुपेश वंजारी, किशोर पाटील, प्रा. वराडे, कैलास वंजारी, दीपक नाईक, देवानंद वंजारी, वैभव वंजारी, ज्ञानेश्वर वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक उपाध्यक्ष नामदेव वंजारी, कोषाध्यक्ष योगेश घुगे यांच्यासह चंदुलाल सानप, संतोष घुगे, भानुदास नाईक, उमेश आंधळे, सुधीर नाईक, अनिल घुगे, सचिन ढाकणे, रामेश्वर पाटील, योगेश घुगे,सतोष चाटे आदींनी परिश्रम घेतले.

Next Post
हिंदी अनुवादक परेश सननसे यांना पीएचडी पदवी प्रदान

हिंदी अनुवादक परेश सननसे यांना पीएचडी पदवी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) तर्फे होऊ द्या चर्चा अभियानाची तयारी सुरू

September 19, 2023
जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न

September 19, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

September 19, 2023
शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव जिल्हा

शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 17, 2023
शेती, पाणी यातुनच महानोर दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन
जळगाव जिल्हा

शेती, पाणी यातुनच महानोर दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन

September 16, 2023
ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम
जळगाव जिल्हा

ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम

September 15, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.