• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पद्मालय येथील गणपती मंदीर देवस्थानच्या अध्यक्षपदी अशोक जैन यांची पुनर्निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 4, 2023
in धार्मिक
0
श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

जळगाव, दि.०४ –  गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड करण्यात आली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय येथे रविवारी २ जुलै २०२३ रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. दरम्यान अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली.

विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा सत्कार देखील करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकताच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. जैन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सभा बोलवण्यात आली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.

श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्वाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात यावी, असा ठराव संस्थानचे विश्वस्त अमित पाटील यांनी मांडला. या ठरावास सर्व विश्वस्तांनी एक मताने मंजुरी दिली. यावेळी संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, आनंदराव पाटील, अमृत कोळी, गोकुळ देशमुख, भिका पाटील, शिरीष बर्वे, डॉ. पी.जी. पिंगळे, अमित पाटील, गणेश वैद्य, अशोक पाटील डोणगावकर उपस्थित होते.

▪️देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होणार.. – अशोक जैन
पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल असे नियोजन आहे. या संस्थानला ‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे नियोजीत कामांना वेग येऊन मंदिर आणि परिसराचा विकास होईल. या संस्थानचा सर्वतोपरी विकास साध्य करण्याचा संकल्प विश्वस्तमंडळाने घेतला आहे. भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे असे पुनर्निवड झालेले अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.


 

Next Post
मनुष्य जीवनात गुरुचे महत्व अपरंपार.. – सुभाष जाधव

मनुष्य जीवनात गुरुचे महत्व अपरंपार.. - सुभाष जाधव

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज
खान्देश

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

December 16, 2025
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group