जळगाव, दि. ११ – शहरातील मोहाडी रोड येथील परिसरात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा मंडळ नऊ तर्फे रविवारी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याबाबत आमदार भोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक तरी रोप लावावे व त्याची निगा राखावी असे आवाहन केले.
याप्रसंगी मंडल नऊचे अध्यक्ष समर्थ राणे, रोहित सोनवणे, हर्षल सोनवणे, लकी चौधरी, संजय तिरमले आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.